STORYMIRROR

manisha samnerkar

Inspirational

4  

manisha samnerkar

Inspirational

मुक्त मी

मुक्त मी

1 min
413

चूल आणि मूल हेच विश्व होतं

तरीही वीट, कंटाळा, आळस नव्हता

दुय्यम स्थानाचं होतं अस्तित्व

नव्हतं कसलंच स्वत्व


सावित्रीने अज्ञानाचा सोडवला फास

शिक्षणामुळे घेतला मोकळा श्वास

सारीच बदलली ही सृष्टी

मुक्त मी होऊन मिळाली मज नवदृष्टी


आता मात्र नाही नमली

डोक्यावरचा पदर कमरेला खोचला

वेगवेगळ्या क्षेत्रात केली प्रगती

सुपरवुमन आहे नवयुगाची


कामात राहते नेहमीच दक्ष

पूर्ण करते आपले लक्ष्य

घर, संसार, नोकरीची असते कास

पूर्ण करण्याचा नेहमी असे ध्यास


अस्मिता जपण्यासाठी लढते

अन्यायाला वाचा फोडते

आपल्या प्रतिमेचा पसरवते सुगंध

नेहमीच लुटत राहते आनंद


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational