STORYMIRROR

manisha samnerkar

Others

3  

manisha samnerkar

Others

मुक्त मी

मुक्त मी

1 min
8

चुल आणि मुल हेच विश्व होतं

तरीही वीट, कंटाळा, आळस नव्हता

दुय्यम स्थानाचं होतं अस्तित्व

नव्हतं कसलच स्वःकर्तृत्व

सावित्रीने अज्ञानाचा सोडवला फास

शिक्षणामुळे घेतला मोकळा श्वास

सारीच बदलली ही सृष्टी

 मिळाली मज नवदृष्टी

आता मुक्त मी झाली

डोक्यावरचा पदर कमरेला आला

वेगवेगळ्या क्षेत्रात केली प्रगती

सुपरवुमन झाली नवयुगाची

कामात राहते नेहमीच दक्ष

पूर्ण करते आपले लक्ष्य

घर,संसार,नोकरीची असते कास

 पूर्ण करण्याचा नेहमी असे ध्यास

अस्मिता जपण्यासाठी लढते

अन्यायाला वाचा फोडते

आपल्या प्रतिमेचा पसरवते सुगंध

नेहमीच लुटत राहते आनंद


Rate this content
Log in