धुळवड
धुळवड
1 min
452
चल सखी धुळवड
रंगात आज न्हाऊ
मस्तीत धुंद होऊन
प्रितीचे तराणे गाऊ
सप्तरंगांना उधळीत
अंबरही लागले खुलू
खग, पाखरांसमवेत
वृक्ष लता लागल्या डुलू
मदहोश होऊन सखे
आज चढली नशा
विविध रंगात सख्या
रंगून गेल्या कशा
सृष्टिही चिंब भिजून
दिसे आज न्यारी
तुझ्यासमवेत तीही
भासे मज प्यारी
धुळवडीच्या रंगात
वसंतही न्हाला
चराचरही आज
रंगांनी धुंद झाला
रंगात मिसळूया
आपुलकीचे रंग
माणुसकीची बाग
फुलवूया होऊन दंग
आनंदाच्या सणी
माणुसकी भरु मनात
विसरून मतभेद सारे
आपलेसे होऊ क्षणात
