स्वप्नातील भारत
स्वप्नातील भारत
माझं एक स्वप्न आहे गरीब असू नये
कोणी पोटभर अन्न मिळावं उपाशी झोपू नये
कोणी माझं एक स्वप्न आहे वंचितांनाही मिळावे शिक्षण आणि कपडे
कोणी सांगेल का बरं त्यांचे सुखाशीच का वाकडे
माझं एक स्वप्न आहे संपावा भेदभाव
जगात राहावी माणुसकी देवा तू सर्वांना पाव
माझं एक स्वप्न आहे सुखी व्हावा शेतकरी आणि जवान
राखून आपण त्यांचा सन्मान जगात भारत देशाची उंच करू मान
