होळी
होळी
होळी आली होळी
खाऊया पुरणाची पोळी,
होळीमध्ये सर्व द्वेष जाळून
भरू सद्गुणाची झोळी
कपटीपणाचा झाला सर्वनाश
अग्नीमध्ये होळीका जळून खाक,
लाकूड, गोवऱ्या सर्व बांधून
आपणही करू संकटाची राख
फाल्गुन पोर्णिमेच्या रात्रीला
सजवू अशी आपली होळी,
फूलाचा हार, प्रदक्षिणा घालून
दाऊ नैवद्य पुरणाची पोळी
गरीब ना श्रीमंत आपण आपल्यात
रंगीबेरंगी होऊन जाऊ,
मैत्री-मैत्रीत एवढं धुंद
रंगाच्या मस्तीत आनंदाने न्हाऊ
इंद्रधनुष्याचे ते सात रंग
सर्वांच्या मनात उमटऊ,
वाईट विचारांना बाहेर टाकून
रंगामध्ये सर्व मिसळून जाऊ
रासायनिक व कृत्रिम रंग टाळूया
रंगबेरंगी सणाला सर्वांना देऊया सदिच्छा,
अन् नैसर्गिक रंग वापरून
रंगपंचमीच्या रंगीत देऊ शुभेच्छा
