मुलगी काळाची गरज
मुलगी काळाची गरज
आई,बहिण,मावशी,काकू
याच्याशिवाय कोणाचच जीवन नाही,
काय विचार करता मग सर्व
प्रश्न पडले असतीलच मनात काही.
आईशिवाय ना मुलीचा ना मुलाचा जन्म
काय झाल म्हणून कशाला पडू देता मग फरक,
जन्म देणारी ही कोणाचीतरी बहिणच ना
का म्हणता मग काय झालया बगू दे बाजूला सरक .
मुलगी नको आहे सर्वाना
मग बायको कशाला,
बहिणच नको आहे कोणाला
तर रक्षाबंधन कशाला.
साथ देईला बायको पाहिजे?
परिवार जपायला आई पाहिजे?
राखी बांधायला बहिण पाहिजे?
मग मुलगी का नको पाहिजे?
विसरतोय आपण सर्वजण
ही तीन नाती जपणारी ही मुलगीच आहे,
तीच्याशिवाय या जगाच कायच चालत नाही
मग बघा स्त्रीजन्माला किती महत्व आहे.
मुलगी किती आहे काळाची गरज
हे तुमच्या लक्षात आलेच आसेल,
तिझा थोडातरी आदर केला आपण
तर स्त्रीशक्ती सर्वाच्या मनात बसेल.
प्रत्येक क्षेत्रात उतरली आहे मुलगी
नाही कोणाचा विचार करत ती आता,
मागे ओडण्याचा प्रयत्न करू नका
खूप महागात पडेल सर्वाना ती माता.
