बाप
बाप
कर्तव्यदक्ष तरीही अबोल
अनुभवलेला असहाय देव,
बाप एक कल्पवृक्ष असतो
दैवाची आपल्यासाठीची ठेव..
पायातल्या चपला झिजताना
डोळ्यातल्या आसवांनी पाहील्या
त्या बापाच्या आशाआकांक्षा
माझ्या सुखाचा सामावलेल्या..
देवानंच जणू अवतार घेऊन
आपल्या सुखासाठी रूप बापाचे,
चंदनापरी झिजून पदरी माप
आपुल्या टाकले सुखाचे....
त्याच्या कष्टाचे गणित कधीच
मी सोडवू शकले नाही,
त्याच्या झिजण्याचे दु:ख
अंतःकरणी छळत राही...
ज्याने सारे आयुष्य वेचले
बापाचे नाव अंतःकरणी जपावे,
आयुष्यातले काही क्षण
त्याचा बाप होऊन जगून पहावे.
🌷🌷👌🙏🙏🌷🌷🌷
