STORYMIRROR

UMA PATIL

Fantasy

3  

UMA PATIL

Fantasy

मृगजळ गझल

मृगजळ गझल

1 min
28.6K


कानांत गूज सारे सांगायचे अचानक

रागात का तुझ्याशी बोलायचे अचानक ?


सारे मला कळाले, मी चूप तोंड केले

खोटे कसे तुझ्याशी, वागायचे अचानक ?


गुंत्यात अडकणे हे, वाटे कठीण आहे

का रोज मी तरीही, गुंतायचे अचानक ?


आधार लाकडाचा, मजबूत गलबताला

संबंध ते कसे मी, तोडायचे अचानक ?


रेखाटले मनोहर, संसार चित्र सुंदर

ते चित्र आपले का, खोडायचे अचानक ?


तोडून हे पुराने नाते तुझ्याबरोबर

नाते नवीन का मी, जोडायचे अचानक ?


हे एकटेच जीवन, बिनधास्त, मुक्तमौला

का मृगजळात खोट्या, अडकायचे अचानक ?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy