Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.
Hurry up! before its gone. Grab the BESTSELLERS now.

Prashant Shinde

Fantasy


3  

Prashant Shinde

Fantasy


समाधानाची तिजोरी!

समाधानाची तिजोरी!

1 min 14.3K 1 min 14.3K


पिवळा,हिरवा,करडा,

केशरि,पांढरा,लाल,

निळा,गुलाबी ,जांभळा

रंगांचा सजवू सोहळा


नवरात्रीच्या उत्सवात

परिधान करूनी रंग सारे

चला संख्यांनो जागवू

रात्री आनंदाने गाउनी गीत प्यारे


झिम्मा फुगडी खेळ खेळूनी

घागर नाचवू चांगली घुमवूनी

निसर फुगडी अन काटवडी

खेळूया ग पदर खोचूनी


गरबा रास क्रीडा डिजे वर

ताल धरूया ग फेर धरूनी

हातात हात घालुनी

गिरकी घेऊया ग दंग होउनी


पिवळे फुटता पहिल्या दिवशी

दुसऱ्या दिवशी हिरवळ उगवेल

तिसऱ्या दिवशीची करडी झालर

चौथ्या दिवशी केशरी तुरा आणेल


पाचव्या दिवशीची शुभ्र अभा

सहाव्या दिवशी लाल कुंभ फोडेल

सातव्या दिवशीची निळाई गगनी

आठव्या दिवशी गुलाबी रंग उधळेल


नऊ दिवसांची सांगता

जांभळा पसरूनी आकाशी होईल

दहाव्या दिवशीं सोने लुटण्या

आई आंबाबाई सत्वर येईल


नवरात्रीचे मौज मजेचे

दिवस भुर्रकन सखे सारतील ग

आठवणीत सदा आनंदी क्षण

सारे सदैव वास करूनी राहतील ग


सोने लुटू ,सोने वाटू घरो घरी

येतील पाहुणे रावणे अन शेजारी ग

आगत स्वागत करुनी तयांचे

भरूया समाधानाची तिजोरी ग.....!


Rate this content
Log in

More marathi poem from Prashant Shinde

Similar marathi poem from Fantasy