नातं बहीण भावाचं
नातं बहीण भावाचं
नातं बहीण भावाचं असते नेहमी,
थोडं खोडकर थोडं भांडखोर,
पण एक सेकंदही एकमेकां,
पासून वेगळे न राहणार.....!
कायमच असते रिमोट वरून,
टॉम अँड जेरी ची फायटिंग,
पण बहिण अडचणीत सापडली,
तर भाऊ बनतात भलतेच डॅशिंग.....!
लाडी गोडी लावून भावाकडून सर्व,
काम करून घेते नाही केलं तर,
पप्पांना सांगेल तू काय करतो अशी,
धमकावणारी ती प्रेमळ खोडकर.......!
तू गेलीस तर मी निवांत असेल
असं कायम बहिणीस बोलणारा,
पण बहिणीची पाठवणी करताना
कोपर्यात जाऊन ढसाढसा
रडणारा.....!
बहीण भावाचे नाते,
नातेही पहिल्या मैत्रीचे,
बंध हे असिम प्रेमाचे,
आणि अतूट विश्वासाचे......!
थोडी हीटलर प्रेमळ,
पण भरपूर काळजी करणारी,
प्रत्येक गोष्ट भावाजवळ,
अगदी मनमोकळे बोलणारी......!

