नजरानजर
नजरानजर
*वळणावर एका अचानक*
*झाली नजरानजर*
*हृदयाची धकधक वाढली*
*मनाला घातला आवर*.....१
*झालो घायाळ मी*
*पाहून लावण्य व रूप*
*स्वप्नातली राणी माझ्या*
*होती अगदी अनुरूप*......२
*नजर कटाक्षाने लागला*
*बाण माझ्या कोमल हृदयात*
*स्वप्ने रंगविली भविष्याची*
*मनातल्या मनात*........३
*स्मितहास्याने तिच्या*
*परमानंद झाला मनोमनी*
*जीवनाचे सार्थक झाले*
*जणू या मानवजन्मी*......४
*आरवण्याने कोंबड्याच्या*
*अचानक जाग आली*
*स्वप्नभंगाने माझी*
*धुळधाणच उडाली*.....५

