चॉकलेट डे...
चॉकलेट डे...
लै दिसापासून प्रिये
तुझी अन् माझी
होतच नाही भेट
मग कसं देऊ तुला चॉकलेट
फेसबुक, व्हॉट्स ॲपवर
नेहमीच बोलतो आपण
रिप्लाय साठी करतो वेट
घालतोय रोज दिड जीबी नेट
कधी भेटायचं ठरलं तर
टाईम आपला जुळत नाही
तू करतेस नेहमी लेट
मग मी निघून जातो थेट
रंगत नेहमी येते गप्पांना
असच बहरत जाईल प्रेम
पण एकदाचा कर अलार्म सेट
अन् जुळून येऊ दे आपला मेट

