STORYMIRROR

Santosh Bongale

Others

3  

Santosh Bongale

Others

प्रतिक्षा

प्रतिक्षा

1 min
302

छाटलेल्या हातांना 

आता फुटलेत कोवळे हात 

ढगांच्या डोळ्यांत 

अंजन घालण्यासाठी 


सुरकुत्या पडलेल्या 

देहावर वारा होतो शिरजोर 

तंतुमय मुळंही सोटमुळासोबत 

मातीच्या कणाबरोबर 

सलगी करून आहेत 

पाणी लुटण्यासाठी 

अन बोटांना हिरवे 

करण्यासाठी 


वाढलीय गुंतागुंत 

धमन्यांची अधिक 

कारण 

आभाळाने गर्जना केलीय 

वादळवाऱ्याच्या संगतीने 

शोषक खोड 

उखडून टाकण्याची 


प्रतिक्षेत आहे कधीची 

माती येथली श्वास रोखून 

अमृतधारांत चिंबता चिंबता 

स्वतःच्या उदरातून प्रसवते 

मोत्यांची रास...


चिमण्यांपाखरांच्या 

पोटासाठी


Rate this content
Log in