STORYMIRROR

Santosh Bongale

Classics

2  

Santosh Bongale

Classics

थेंब थेंब पाणी

थेंब थेंब पाणी

1 min
250

थेंब थेंब पाणी

जिरलं रानात

जवार सोनसळी

कशी आली भरात


सळसळे अंगभर

जवानीचं पाणी

चांदण्या रातीला

गुणगुणते गाणी


कमालीचा ग तोरा

पाखरं झाली वेडी

घिरट्या घालून

कशी काढतात खोडी


मोहरली ग काया

गंध झाला रानभर

कसा गुपचूप झाला

बाई बोभाटा गावभर


अल्लड वारा रोज

घुसमटे अंगभर

झिंग चढलेली पोर

केव्हा येईल भानावर 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics