अक्षरांची पेरणी
अक्षरांची पेरणी
अक्षरांची मी करतोय पेरणी
भ्रष्टाचाराचे तन माजलेल्या
शिक्षणाच्या शेतात …
किती पाणी दिले आजपर्यंत?
घामाच्या पाटातून ……
ज्ञानाचे किती वाफे भिजले?
रोजच राखण करतोय
व्यसनांच्या पाखरांची…
काय सांगावं
आलेलं हातचं पिकही
चिकासहित ओरबाडतील
ध्येयाचे पिक ….
अजून तरी हाती नाही आलं.
वाट पाहतोय
आशा मनात ठेऊन …
जाऊ द्या
आपण मात्र प्रामाणिक शेती करावी
चाकरीचा गडी समजून
कधीतरी देईलच की मालक
बोनस दिवाळीसाठी …