आल्या नभातूनी सरी
आल्या नभातूनी सरी
आल्या नभातूनी सरी
आनंदुनी गेले रान
धरील आता जोमानं
रांगणारं पीक नवं बाळसं
सावल्या शिवारात माझ्या
हरिनामाचा चाले गजर
अभंग गातो पाखरासंगे
विठू डोलतो पिकासमोर
वेडी झाली पिके सारी
ताल धरून नाचती
वारा वाजवितो मृदंग
घडो सेवा मातीची अभंग
नाही मंदिरी अन देव्हाऱ्यात
देव नांदतो हिर्व्यात
कशाला करू पायपीट
भक्ती फुलू दे ऱ्हदयात
