STORYMIRROR

Santosh Bongale

Abstract

4  

Santosh Bongale

Abstract

अर्थाविन

अर्थाविन

1 min
328

दप्तराचे ओझे वाहता वाहता 

पदव्यांचा ढीग जमा होत राहिला

पोकळ अभिमानाने मान ताठ होत गेली

पण

पाठीचा कणा मात्र वाकत राहिला

उपाशीपोटी ढेकर देत 

पिढ्या घडवताना  

आभासी तत्वज्ञान रचत चाललोय


कौशल्याचा बोजवारा उडाला अन 

सत्तेची आयाळ कुरवाळत 

पत्ताच लागला नाही 

सरून गेलेल्या आयुष्याचा


बाजारात हिंडुन फिरून 

भाजी घ्यायचं धाडस होत नाही, 

रिकाम्या खिशात हात जाताना 

मनात विचार घोळत राहतो 

घरातील विकून टाकावा का

पाळलेला ढिगारा पुस्तकांचा 


व्यवहारज्ञान देणारी शाळा 

आता सापडत नाही कोठेच 

गोल्डन जुबली इंग्रजाळलेल्या स्कूलमधून 


सौंदर्यशास्त्राचे धडे घेताना

जगण्याचं अर्थशास्त्र कुठे पसार झालं

हे कळलंच नाही, 

अभ्यासक्रमाची चाळण करताना 

आर्थिक स्वावलंबनाचे धडे

दिसलेच नाहीत कुठे


जीवनाला हवा असतो अर्थ म्हणून 

अर्थपूर्ण साक्षर व्हायला हवं होतं, 

गुलामीतल्या जगण्यात खरंच 

अर्थाविन असतो काय पुरूषार्थ? 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract