STORYMIRROR

Santosh Bongale

Others

3  

Santosh Bongale

Others

मोकळ्या ओंजळीत

मोकळ्या ओंजळीत

1 min
266


कुठे ठावे दुःख मोकळ्या आकाशाला 

येथे जगताना आग बेचैन काळजाला


उडाली पाने आयुष्याची वाऱ्याबरोबर 

स्वप्न घेऊन डोळ्यात रांग लागे देवळाला 


गर्दीत दलालांच्या पूजले रानाला कितीदा 

बोले पिकात विठ्ठल काय पाहसी कळसाला

 

राजकारणाचे धुके लागले गाव गिळायला 

कंठ दाटून येई पाहून मोकळ्या दावणीला


झाडांनीही ऐकल्या विराण्या दु:खाच्या 

मिटली ना तहान प्रश्न विचारून पावसाला


डोलायचा पिकात कणसाला दाने लगडता  

काय मोकळ्या ओंजळीत अनंत प्रवासाला



साहित्याला गुण द्या
लॉग इन