या सांजवेळी
या सांजवेळी
फुल फुलले, कळी उमलली
आज सांज वेळेला, गंध सुटला
भावनांना आज सांज वेळेला
पहिले मी आज तुजला
लाजरी, हासरी मुद्रा
भावमनी प्रगटला, आज सांज वेळेला
रातराणीचा सुगंध चहूकडे पसरला
गंध सांजवेळेला,भावाविश्वात रंगला
स्पर्श हा तुझा रेशमी
गोड शब्द पडता कानी
विरह सहन होईना,आज
सांजवेळेला अश्रू आले लोचनी
तेच तुझे रूप साजिरे
मनी मी आज साठवितो
आकाशीच्या चंद्रासमान
मुख मज खुणावितो
सांजवेळी रूप तुझे
रंगछटांनी उजळते
गोजिरी ती सूर्यकिरणे
सौंदर्य तुझे न्याहळते