आमचा महिला दिन
आमचा महिला दिन
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
घरोघरी देव्हाऱ्यात,चला पूजू बायकोला
चला चला रे मित्रांनो महिलादिन तो आला (धृ)
पत्नीला भुलवाया आणू आवडीची साडी
गोड वचनांची लावू जरा तिला लाडीगोडी
कटू शब्दांचे ते तीर सज्ज ठेवूनी भात्याला (१)
किती दमतेस राणी घालू फुंकर शब्दांची
देऊ हॅाटेलात पार्टी करु हवा ती प्रेमाची
वर्षभर करु उभी , चारीठाव रांधायाला (२)
खेळू चला खोटाखोटा ,खेळ एक दिवसाचा
आज भासवू तिजला, मी गुलाम राणीचा
स्वातंत्र्याच्या समतेच्या ,देऊ भूलथापा तिला (३)
देऊ गोड गोड नावे, नारीशक्ती आदिशक्ती
सन्मानाच्या सोहळ्याची,करु नाटके ती किती
हक्काची ही दासी , उद्या आहेच सेवेला (४)