भीमवंदना
भीमवंदना
भारतीय हृदय सिंहासनी अढळ तुमचे स्थान
विश्वरत्न असा जगती लाभलासे सन्मान
वंचितांच्या , शोषितांच्या अंधारमय जीवनात
भेदाभेद दूर करून उजळली ज्ञानाची ज्योत
पददलितांना दावली मंगलवाट समतेची
ज्ञानरूपी बळ भरुनी गगनभरारी घेण्याची
जाणीव करून दिली, दीनदलितांना स्वत्वाची
जगतामध्ये संधी उन्नत माथ्याने जगण्याची
साधला समन्वय शिक्षण आणि शीलाचा
एकच ध्यास मनी राष्ट्राच्या उन्नतीचा
भारतरत्न उपाधीने गौरवले या ज्ञानसूर्याला
विनम्रभावे वंदन करीते या महामानवाला
