शब्दांची नगरी - स्वप्नरथ
शब्दांची नगरी - स्वप्नरथ
आजही आहे चंद्र साक्षीला,
बालहट्टी स्वप्न रथावर स्वार व्हावे..
स्वप्नांच्या दुनियेत हरवुनी,
चांदण्याच्या गावात अनवाणी धावावे..
निरभ्र आकाशी चंद्र साथीला,
शुक्राची चांदणी व्हावे..
सुखाचा चंद्र काबीज करुनी,
पाळणा बांधुन झुलत राहावे..
कृष्ण ढगाईतल्या चंद्र रुपाला,
न्याहाळताना चकोर पक्षी व्हावे..
दुरूनच बघण्याची आस मनात ठेऊनी,
आठवणीतला तारा होऊन तुटावे..
पौर्णिमेच्या चंद्र प्रकाशाला,
गर्द निळ्या आकाशी तारका व्हावे..
चांदण्या समवेत एकत्र येऊनी,
शीतल प्रकाशात न्हाऊन निघावे..
अमावस्येच्या चंद्र काळोखाला,
नक्षत्रांच्या स्वाधीन व्हावे..
गडप चंद्राचा शोध घेऊनी,
लुकलुकणारा लपंडाव खेळावे..