STORYMIRROR

शुभांगी कोतवाल

Abstract

4  

शुभांगी कोतवाल

Abstract

मन

मन

1 min
21

मनाला काही बांध नाही 

वाहत्या पाण्याला पाट बांधारे आडवी

मनाला कोण आडवी ?


बहिणाबाईंची ती प्रसिध्द कविता

" मन वढाय वढाय , उभ्या पीकातल ढोर"

तंतोतंत खरी आहे 


मनाचा वेग अमाप 

वाहत्या वाऱ्याहूनही वेगवान 

आत्ता इथे तर क्षणात कुठे

मनाचा काही थांग पत्ता नाही 


इतके चंचल इतके अस्थिर

फुलपाखराहून जास्त भिरभिरणारे

सतत फिरत राहणारे 


जागेपणी स्वप्न पाहणारे मन

इच्छा आकांक्षा बाळगणारे मन

जिद्दी आणि स्वच्छंदी मन 


हळवे आणि मृदुही मनच

तर कठोर आणि निष्ठुर ही मनच

शिस्तशिर आणि नियम बद्ध ही मनच


ज्याने मनावर ताबा मिळवला

तो संत महापुरुष झाला

सामान्य माणसाला ते नाही जमलं 


मन इर्षाळू आणि  दयाळूही

मनाचे किती ते पहेलू 

मन दुखता  मनाला ठेस लागते

असे ते नाजूक मन 


ज्याला मन जपता आलं 

स्वतःच आणि दुसऱ्याचं

तोच खरा अर्थाने शिक्षित 


दृढ निश्चई आणि खंबिरही मनच 

सुंदर विचार करणारेही मन

ध्येय गाठायला मदत करणारे मनच 


मन संशयी, संयमी तर कधी निरागस 

गुपित ठेवणारे , विचार करणारे मन

असे हे न उलगडणारे मन


कधी न दिसणारे 

पण सर्वात महत्वाचे असे हे मन 

जे कधी अनावश्यक घाबरत

तर कधी निडर होऊन जातं 


फक्त बाह्य सुंदरता नाही

तर निर्मळ, सोज्वळ असे मन

आपल्याला आणखीन सुंदरता देते.







































साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract