पहाट
पहाट
कशासाठी अजून त्याच त्याच आठवणी
नैराश्य अपयश फसवणूक आणि उद्वेग
दूर दूर पर्यंत कोठेही उमेद आणि उत्साह नाही
कोणी म्हणायला अशी भक्कम साथ नाही
जिवाभावाची कोणी मैत्रीण मित्र नाही
जणू वाऱ्याच्या उलट दिशेने निघाले होते
कितीही परिश्रम प्रामाणिकता होती तरीही
यश मात्र माझ्या पासून कोसो दूर पळत होते
आणि मी त्याचा पाठलाग करत होते
कधीतरी दिवस पालटतील अशी आपली ह्या वेड्या मनाची खात्री
कोणीतरी मला समजून घेईल माझी साथ देईल
माझ्यासाठी वेळ काढेल एक सच्ची मित्रता होईल
दैवी कृपा होईल, देवाला तरी किती आळवायचं?
किती हात जोडून प्रार्थना करायची आणि देवाकडे मागत राहायचं?
का असं नशीब घेवून जन्मले मी?
की मीच कुठेतरी चुकले? मला ह्या जीवनाचा अर्थच कळला नसेल कदाचित
माझा हट्ट आणि आशावादी असणं चुकीचं होतं का?
माझा निखळ आणि भावनाशील स्वभाव तर चुकीचा नाही?
की हे जगच असे आहे? चांगल्याची अपेक्षा कारणच चुकीचं
वेळेवर निर्णय न घेतल्याने काही चुकीचं वागल्याने
कदाचित असं झालं असावं असा स्वतःला दोष आणि चुकीचं ठरवलं
आणि हे सगळे विचार धुडकावून लावत मनाशी निश्चय करत झोपी गेले
सकाळ झाली खुप विलक्षण प्रसन्नता घेवून आली
पारिजातक मधुमालती ह्याचा गोड सुगंध दरवळत होता
मनावरचं जळमट दूर झालं होतं दडपण नाहीसं झालं
नवीन उमेद आणि उत्साह घेवून आली होती ती पहाट
मनाची खात्री होती आता सगळं सुरळीत होणार
संथ वाहणार जीवन आता झुळझुळ वाहत होतं
जे हवं ते सगळं साध्य होणार अपेक्षा फळणार
नवीन ओळखी नवीन मैत्री नाती जुळून येणारं
नैराश्य दूर होऊन आता नवीन उमेद जागी झाली
वाऱ्याच्या स्पर्श सुखावत होत्या जागं करत होता
जणू आता आम्ही सर्व तुझ्या साथीला आहोत असं सांगत होता
कधी न अनुभवलेला आत्मविश्वास जागा करत होता
आता आम्ही तुझ्या पाठीशी आहोत यश मिळणारच
कोडी उलगडणार प्रश्न सुटणार दुविधा मिटणार
त्या पहाटेत एक विलक्षण आनंदाची अनुभूती होती
किंतू परंतु अथवा जर तर असं काहीच नव्हतं
मायेची एक ऊब होती भक्कम आधार होता
कुणाची भीती नव्हती काळजी नव्हती
होती ती फक्त एक सुंदर अनुभूती
पाहूया अश्या ह्या सुंदर पहाटेच्या गर्भात काय दडलंय ते ?
