STORYMIRROR

शुभांगी कोतवाल

Abstract

4.5  

शुभांगी कोतवाल

Abstract

रस - स्वाद

रस - स्वाद

2 mins
98

आमच्या कडील कुळधर्म कुलाचार वा बालाजीचं पारणं असता 

पारंपरिक जेवणाची बातच न्यारी

विविध पदार्थ आणि विविधता भारी 

ताटाभोवती सुंदर रांगोळी व बसायला पाट

असा असे सर्व थाट, डाव्या बाजूला पाण्याचा ग्लास

ताटात आधी मीठ वाढणे आवश्यक

ताटाच्या डाव्या बाजूस अगदी वर मीठ 

त्या खाली येते रसरशीत लिंबाची फोड चतकोर

त्या नंतर चटण्या आणि कोशिंबीरी

हिरवी चटणी जवसाची तपकिरी चटणी

तिळाची खरपूस चटणी आणि खोबऱ्याची चटणी 

कोशिंबीर काकडीची केळीची वा पेरूची

कधी खोबऱ्याची तर कधी मुळ्याची किसलेली कोशिंबीर

त्यात घरचं विरजलेलं घट्ट दही 

अनेक प्रकार आणि अनेक चवी 

त्या नंतर चणा डाळीची खमंग वाटली डाळ

तर कधी भिजलेल्या मुगाची साताळलेली डाळ

त्या नंतर आमसुल तिळाचं  वाटलेलं पंचामृत

तर दह्यात कालवलेलं खमंग मेतकूट

त्याच बरोबर कुरकुरीत कुर्डई आणि पापड

मिठाच्या वर तळलेली विविध भजी

बटाटा कोबी मिरची गीलके व  पुईची  पाने 

उजव्या हाताला मसालेदार भाज्या त्यातही किती प्रकार

वांगी - बटाटा , दुधीची डाळीचे वडे घातलेली

तर कधी फ्लॉवर -  बटाटा कोबी - बटाटा 

पातळ भाजी असे मेथीची वा पालकाची

तर कधी अळूच्या पानात दाणे खोबरं घातलेली

वरून मोहरी हिंग लाल तिखट व मिरचीची फोडणी

आता येते वेळ मऊसूत माखलेल्या पोळीची व 

त्यावर असे रवा - बेसनाचा रगडिव लाडू

शेजारी वाढली जात असे पुरणाची पोळी  

गवल्याची खीर आणि ज्वारी बाजरीचे रोडगे

वाटीत असे गरमागरम उकळती आमटी

आता वेळ येई भाताच्या मुदिवर साध्या वरणाची 

सर्व पदार्थ वाढले गेल्याची खात्री करून

वाढलं जाई साजूक तूप भात वरण व पुरणाच्या पोळीवर

नंतर ठेवली जाई दक्षिणा  सवाष्ण ब्राह्मणाच्या ताटापुढे

सवाष्ण बाईला हळदी कुंकू तर पुरुष आणि मुलांना

 लावलं जाई दोऱ्यानी कपाळावर दुहेरी आडवे गंध

आणि मग घरातल्या पुढची वाढ करणाऱ्या बायकांची

 परवानगी घेवून आणि सवाष्ण ब्राह्मणाची

" उशीर झाल्याबद्दल क्षमस्व म्हणून स्वस्थ होवू द्या बरं जेवण" असं म्हणून होई जेवणाला सुरूवात.

किती वेळापासुन विविध पदार्थ आणि त्याचा सुगंध

 आणि आता भुकेवर नियंत्रण करणे कठीण असे सर्व

 जणू त्या जेवणावर ताव मारत असत

दुसरा भात वरण तर कोणी येई घेवून 

भजी भगराळी डाळ वडे पापड कुर्डई

पातळ भाजी दुसरी भाजी तर कोणी घेती कोशिंबीर

आता होई लगबग गरम - गरम पुरणपोळीची 

त्यावर तूप तर कधी आग्रह लाडूचा होई 

गरम पोळी व आमटी ची फेरी होई 

शेवटचा भात व आमटी तर कुणी घेई दही

आणि असं ते साग्रसंगीत जेवणाचा बेत आणि रसस्वाद घेत होई पहिली पंगत संपन्न 

आता वेळ येई घरातील मोठ्या स्त्रियांची जेवायची

तिकडे हात धुवून पुसून बैठकीत चाले विडा सुपारी

खूप जेवण झालं जास्त जेवलो असं म्हणत संतुष्टिने

 निरोप घेत जाती  सवाष्ण ब्राह्मण आपल्या घरी

लहान मुले होती खेळण्यात मस्त तर मोठी होती झोपेने सुस्त 

बायकांची चाले अन्नाची व भांड्यांची आवरा आवर 

असा असे तो सर्व सोहळा न चुकता दरवर्षी .







साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract