स्थित स्वप्न
स्थित स्वप्न
1 min
303
चुकली तरीही
पुसूनी टाकावी मनी
वाहिल्या निर्माल्य
जश्या नदितूनी
घाव मनीचा
किती सांभाळावा
रुक्ष पणाचा
आव तरी, किती आणावा
ठिणग्यांचा दाह
किती का सोसावा
लेपूनी तो ओसरावा
ओसंडून वाहणाऱ्या आसवात
देव यावा देव्हाऱ्यात
तसा योग क्वचितच दिसतो
मन मोकळा जसा पोकळ्यात
तोच फक्त रिक्त जीवन जगत असतो
का करावे नसते बाकी उणे
अंगिकारावे रिक्त जगणे
मनाच्या कुठल्यातरी रकान्यात
डांबलेली जुनी जळमटं
धूऊन काढावी कधीतरी
झुडकरावं असं फर्फटण
बंद करावं कुर्बुरण
एकांत साधावा
एकचित्त अनुभवावं
जागृत होई नवस्पंदनं
दिशा मिळावी नवीन
एकसंध एकरूप मग
रचावे स्थित स्वप्न