मानवाच अस होईल का?
मानवाच अस होईल का?
दिवस थकला होता, सांज होऊन,
रात्रीच्या काळ-अंधाऱ्या कुशीत, निपचित पहुडला होता.
कातर-सरते-वेळी प्रकाशाने, हळूच अंधाराच पांघरुण उघडलं,
तस दिवस सुद्धा, आळस देत, आटा-पीटा करत, पहाट होऊन,
'मी परत आलोय' ची साद घालत होता.
--मानवाच अस होईल का?
दिवस आता, दुपार होऊन, धगधगत होता.
पुन्हा थकला होता, तसा मावळतीने गोंजारून,
पुन्हा त्याची सांज होऊन,
रात्रीच्या काळ-अंधाऱ्या कुशीत तो जातच होता,
इतक्यात सांजेच्या एका तीक्ष्ण प्रकाशाने,
अंधाराला ताकीद दिली,
'मी तुझ्या कुशीत तर येतोय, पण ते परत, पहाट होऊन, दिवस म्हणून उजाडण्या साठीच.
--मानवाच अस होईल का?