STORYMIRROR

Sarika Jinturkar

Fantasy

3  

Sarika Jinturkar

Fantasy

मन

मन

1 min
225

मन म्हणजे निर्जल 

खळखळत्या पाटाचे पाणी  

मनाच्या कप्प्यात साठवून ठेवली जातात

आयुष्यातील कडू-गोड आठवणींची गाणी  


मनात असतात सुखदुःखाचे तरंग अपार

 आयुष्यात परीक्षा देत जायचे असते समुद्रापार  


अमर्याद आशा आकाशाचा सागर  

तिन्ही ऋतूत फुलणारी पांढरीशुभ्र तगर  


कधी चंचल वारा कधी तुफान पाऊस 

कधी रिमझिम धारा 

कधी समजणारे कधी बेभान होणारे 

कधी आपले कधी हाताबाहेर जाणारे  

कधी घाबरट कधी कणखर 


कधी आनंदाच्या सरींची बरसात करत

कधी व्यथेचा सागरात आनंदाने 

एकटेच डुलत☺️


 कधी मिळवता न आल्याने एखादी गोष्ट उगाच झुरत

 कधी आठवणींसोबत भविष्याचं चित्र रंगवतं


 कधी अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी खूप आनंदी होत

कधी मोठ्या दुखात स्थितप्रज्ञ राहतं

  

कधी झुळूक वाऱ्याची बनवून 

फुंकर हळूवार स्पर्श करून जात

 क्षणात उंच घेवून भरारी, गिरकी घेवून क्षणात खाली येत 


कधी मन भिर भिर भवरा शांत

 तर कधी संयमी राहत 

कधी दाटून येत कधी हरवून जात  

कधी गतकालीन सगळ्या आठवणींना भेटून पण येत


सैरावैरा मनाला साथ देत

 हृदय हे आपलीच ओळख जपत  

प्रेमाला अलवारपणे गोंजारून , चांगल्या वाईटाची जाणीव पण करून देत  


क्षणात इकडे क्षणात तिकडे  

असंख्य रहस्य दडवून ठेवत


मन असतंच आपल्या विचारांचे प्रतिबिंब  

भावभावनांचा ठेवा, थोड अलवार असं स्पंदनाने गुंफलेलं

वाहत्या पाण्यासारख जसं मोहक वाटेवर ओलेचिंब झालेलं

ओघात भावनेच्या कसं क्षणा क्षणात बहरलेलं

विविध रंगांनी साकारलेलं अदृश्य,छोटसं  

सर्व सामावून घेणार...हे मन 

 कधी ह्याच्या स्पर्शाने शब्दांची गुफंण करित कविता बनते 

भावनेच्या मग साथीने रूप तिचे आणखी खुलते  


मन असंच गार वाऱ्यात

 झुलणारा उंच झोका 

त्यावर जोडलेला असतो 

आपल्या हृदयाचा ठोका  

बेधुंद लाटांची लहर त्याला 

असते नक्षीदार शंख शिपल्यांची झालर 

आठवणींचा चुडा जसा की सुगंधी मंत्रमुग्ध करणारा फुलांचा सडा...


उडते कधी वाऱ्या सोबत 

कधी अलगत हळुवार वाटे उडावे त्याच्यासवे 

होऊन मुक्तांगण भावनांचे अन जपावे ऋणानुबंध नवे..

मनाला पटेल, योग्य तेच करावे  

आलिंगन देत जीवनाला मनसोक्त जगावे.. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy