आतले
आतले
म्हणे आरसा गुंतल्या सारखा
दिसेना कुणी आपल्या सारखा
दिला जन्म हा ईश्वरा या इथे
पटाला तडा लागल्या सारखा
वसे जन्म हा भ्रष्ट नेत्यां सवे
इथे कायदा नासल्या सारखा
कधी आत जातात ते आतले?
पुसे आतला मातल्या सारखा
हरी आत तुम्ही म्हणे राहता
मला ही करा आतल्या सारखा
