जा तू...
जा तू...
मनाला जाळून जा तू,
जा,मला सोडून जा तू...
रोखणार कोण तुला
प्रेम विसरून जा तू...
ओल्याचिंब मनाला या
एकटे सोडून जा तू...
नकोत खोटी वचने
खरेच बोलून जा तू...
हृदयात आहे प्रेम
ते चुरगाळून जा तू...
रोखतील अश्रू तुला
पण सांभाळून जा तू...
