काजव्यांची रात
काजव्यांची रात
1 min
220
रात्रीस आज या काजव्यांनी
उजळून टाकले होते,
आमुचे सोयरे काळोखात
प्रकाशून निघाले होते...
हजारो काजव्यानी होऊन एक
चित्रकारी दाखवली होती,
कोणी नव्हते पाहायला फक्त त्या
शांततेनेच ही रात पाहिली होती...
असे वाटत होते जणू तरूपर्णांनी
सांडावे खिशातून त्यांच्या सोने,
रात्र असावी आजची नवी पण
पण हे योग असावेत जुने...
नसावे कोणतेही वादळ त्रास देण्या
फक्त काजव्यांची मैफिल जमावी,
हे सगळे गुपचूप ऐकण्याची त्या
रजनीचीही मनापासून तयारी असावी...
