निसर्गाचा आनंदोत्सव
निसर्गाचा आनंदोत्सव
1 min
223
लागे मृगाची चाहूल
मनी दरवळती धारा,
मेघराजाचे पत्र मज
आणून देई वारा ||१||
येई वाऱ्याची झुळूक
संपे अंगाची लाहीलाही,
चातक जमीनीवर थेंब
पडण्याची वाट पाही ||२||
होई गडगडाट नभी दिसे
ढगांवर झालर काळीभोर,
नाचण्या मनसोक्त करी
रंगीत तालीम मोर ||३||
गार वाऱ्याच्या संगीताने
शहारे येती अंगावरी,
निसर्गाचा आनंदोत्सव
होई आज भुईवरी ||४||
