मला बाबांना पहायचंय
मला बाबांना पहायचंय
1 min
230
रोज पाहतो बाबांना
तरीही मला बाबांना
वाचायचंय,
बाबांच्या अंतरंगातील
प्रत्येक अनुभवाला
भेटायचंय
मला बाबांना पहायचंय...
मला बाबांच्या पावलांवर
पाऊल टाकायचंय
आशिर्वाद घेऊन त्यांचा
जन्मभर चालायचंय
मला बाबांच्या ज्ञानरूपी
अणूंना वेचायचंय
मला बाबांना पहायचंय...
ताई सासरी जाताना येईल
मुखवट्याखालील जगात
जो हुंदका त्याला कागदावर
रेखाटायचंय
एक दिवस बाबांच्या मनातील
गोष्टींना जाणायचंय
मला बाबांना पहायचंय...
