फक्त कॅन्डल मार्च
फक्त कॅन्डल मार्च
एकीकडे तिच्या जीवाचे
लचके तोडले जातात,
अन् दुसरीकडे हेच लांडगे
स्वतःल मावळे म्हणून घेतात...
कधीकधी तर तिचा अमानुषपणे
घेतला जातो जीव,
पाहतात सगळे फक्त पण
पण कोणालाच येत नाही कीव...
कधी हुंड्यासाठी,कधी दिव्यासाठी
तिचा छळ केला जातो,
कधी संपतो तिचा श्वास अन्
फक्त कॅन्डल मार्च होतो...
