STORYMIRROR

Rutuja kulkarni

Fantasy Others

3  

Rutuja kulkarni

Fantasy Others

चंद्र कुशी होऊन आला

चंद्र कुशी होऊन आला

1 min
274

काजळी ओढून नभ तो , 

रात्र ही घेऊन आला. 

मला सावरण्यासाठी आजं, 

तो चंद्र कुशी होऊन आला..! 


एकाकी भासणाऱ्या मनासाठी तो, 

माझा सखा होऊन आला. 

मला सावरण्यासाठी आजं, 

तो चंद्र कुशी होऊन आला..! 


आयुष्यात माझ्या बहर फुलवण्या तो,

रातराणीचा सुगंध घेऊन आला. 

मला सावरण्यासाठी आजं, 

तो चंद्र कुशी होऊन आला..!! 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy