कोजागिरी पौर्णिमा
कोजागिरी पौर्णिमा
निळ्या नभी सोनेरी कळा चंद्राची
तेजोमय रात्र ही कोजागिरी पौर्णिमेची...
सजली निशाच्या अंगणी
श्रृगांरीक आरास चांदण्याची
चंद्राच्या शीतल छायेत न्हाऊन
धवलकीत झाली ही नभागणी
शीतल कोमल छटा पांढरी घेऊन
किरणांच्या सरी आल्या नाचत भूवरी
अश्विन पौर्णिमेच्या चंद्राची शोभा भलतीच न्यारी
पाहून त्याच्या रूबाबाला थिजली तारका नगरी ही सारी
कलेकलेने वाढत चंद्र आज पूर्णत्वाला गेला
उगवला कांचनवर्णन लेऊनी अन् रुपेरी रूपात चमकला
धवल देखना दूरवर लखलखणारा
चंद्राचा शीतल प्रकाश मनाला प्रसन्न करी
चंद्राचं प्रतिबिंब पाहण्यात प्रकाश फुले घेऊन
ओंजळीत जणू रात्र ही आली...
