STORYMIRROR

निलेश कवडे

Abstract Fantasy

3  

निलेश कवडे

Abstract Fantasy

काई_वांदा_नाई_भावा

काई_वांदा_नाई_भावा

1 min
370

अथिसा तथिसा ईचुकाटा, काई वांदा नाई भावा!

त्याले दाखोतो ना दट्ट्या, काई वांदा नाई भावा!


ईश्वासाचा घिऊन पालू रोज सारवू नातंगोतं

यिऊ दे भितीले धापोडा, काई वांदा नाई भावा!


तू माह्या अन तुया दोस्त मी, आपुन दोघं जगू मनानं

भले असे ना खिसा रिकामा, काई वांदा नाई भावा!


जसा जमाना तसं यापुळे रोखठोक वागू समद्याशी

राह्ये ना कोनी हेकोळा, काई वांदा नाई भावा!


डेबूनं सांगतलं व्होतं, समदं भुलला काय यकायक

जरी वलांडा बी वलांडला, काई वांदा नाई भावा!


ईनाकारन कोनावर बी हमेशा यिऊ नोको खिजरू

समजा केला कानाडोया, काई वांदा नाई भावा!


येता जाता सोनचिळीचं आवळते हिडगावनं मले

तिनं घेतला माह्या ताबा, काई वांदा नाई भावा!


कायजात आमाशिक असते, सदई पोट्टेशाई बाकी

म्हनून हाये धांगळधिंगा, काई वांदा नाई भावा!


येचुन काटे साजरं करू आपुन देशाचं आंगन

आंगनात येलशेल गारा, काई वांदा नाई भावा!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract