STORYMIRROR

निलेश कवडे

Abstract

3  

निलेश कवडे

Abstract

आठवण

आठवण

1 min
213

पैजणांची मंजुळ धून 

मजला खुणावून गेली...

सखी माझ्या काळजाचे

दार ठोठावून गेली...


नजरेला मी नजर दिली 

तिची नजर अलगद झुकली...

तिचे शहारले अंग अन् 

रात्र श्वास रोखुन बसली...


विरहाची तहान शमली

दोघांचे श्वास मिसळले...

लाजल्या सा-या चांदण्या 

चंद्राने डोळे मिटले...


दिवा मंद होता होता

कळले ना केव्हा विझला...

पहाटेच्या गारव्याने

रात्रीचा ज्वर ओसरला...


काही फुलांच्या पाकळ्या 

अन् तुटलेले पैंजण...

अमुच्या मिलनाची इतुकी

मागे राहिली आठवण...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract