STORYMIRROR

निलेश कवडे

Abstract Children

3  

निलेश कवडे

Abstract Children

आला बेधुंद पाऊस

आला बेधुंद पाऊस

1 min
175

आला बेधुंद पाऊस 

आता ओलेचिंब होऊ

पावसाचे गात गाणे

छान ओसंडून वाहू


गार पावसाळी वारा

अंगभर थरथर

जिव्हाळ्याच्या मृगधारा 

साठवतो मनभर


थेंब थेंब पावसाचा

अंगाखांद्यावर झेलू

मनसोक्त भिजतांना 

पानाफुलासंगे नाचू


माझ्या निष्पर्ण देहाला 

नवसंजीवनी आली

पुन्हा बहरण्यासाठी 

नवी उमेद मिळाली


झटकून मरगळ 

धुंद पावसात न्हाऊ

देहभान विसरुनी 

आज पावसाचे होऊ


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract