STORYMIRROR

निलेश कवडे

Abstract Fantasy

3  

निलेश कवडे

Abstract Fantasy

आठवणींचे...

आठवणींचे...

1 min
182

 उरले सुरले जगतो आहे जीवन आठवणींचे

 आयुष्याच्या संध्याकाळी गुंजन आठवणींचे


 डोळ्यांमध्ये जमली माझ्या गर्दी आठवणींची

 ओसंडुन मग वाहे अवघी भरती आठवणींची

 आठवणींच्या ओलाव्याने सुटले भिजल्यावरती

 या देहाच्या भिंतीवरती कंपन आठवणींचे


 आठवणींच्या मृद्गंधाने अजुनी मोहरतो मी 

 मोहरलेल्या हृदयासंगे हल्ली वावरतो मी 

 आठवणींचा मोरपिसारा फिरतो अंगावरती 

 जेव्हा जेव्हा दरवळते हे चंदन आठवणींचे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract