Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

निलेश कवडे

Classics

3  

निलेश कवडे

Classics

मोर्णा माय माझी

मोर्णा माय माझी

1 min
290


मोर्णा माय माझी । पुर्णेची बहीण ।।

माहेरवाशीण । चंद्रभागा ।।


मोर्णा माय माझी । पंढरीचं तीर्थ ।।

ममतेचा अर्थ । सांगणारी ।।


मोर्णा माय माझी । वाहे नागमोडी ।।

तिच्यामध्ये गोडी । अमृताची ।।


मोर्णा माय माझी । आहे पुण्यदायी ।।

नदी मोक्षदायी ।। गंगेपरी ।।


मोर्णा माय माझी । पहाटे सोनेरी ।।

रात्रीला चंदेरी । शृंगारते ।।


मोर्णा माय माझी । कावडींना भरे ।।

अभिषेक करे । राजेश्वरा ।।


मोर्णा माय माझी । वाहे झरझर ।।

घेउनी पदर । मोरपंखी ।।


मोर्णा माय माझी । सृष्टीचं लावण्य ।।

श्रावणी चैतन्य । अकोल्याचे ।।


मोर्णा माय माझी । माहेर हक्काचे ।।

सौभाग्य गावाचे । मोर्णा नदी ।।


मोर्णा माय माझी । मोर्णा माय माझी ।।

मोर्णा माय माझी । मोर्णा नदी ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics