गजानना
गजानना
1 min
119
तू विद्याधिपती,
तू तपोमूर्ती गजानना ।।
नमन करतो तुला,
हे मंगलमूर्ती गजानना ।।
तू कलांचा संगम ।
तू जीवनदायी सरगम ।।
बुद्धी दे, नवशक्ती दे ।
कर दूर अमुचा संभ्रम ।।
तू सर्वज्ञ , तू विघ्नहर्ता ।
हे स्वामी गजानना ।।
नमन करतो तुला ।
हे मंगलमूर्ती गजानना ।।१।।
जगायला आशय दे ।
अनुपम अर्थ दे ।।
आशिष दे, समृद्धी दे ।
ऊर्जादायी सामर्थ्य दे ।।
जीवन समर्थ कर ।
हे गणपती, गजानना ।।
नमन करतो तुला ।
हे मंगलमूर्ती गजानना ।।२।।