STORYMIRROR

निलेश कवडे

Abstract Fantasy

3  

निलेश कवडे

Abstract Fantasy

तुला सक्ती नाही

तुला सक्ती नाही

1 min
327

तुला सक्ती नाही, 

मोकळा श्वास घे

आणि आयुष्याला

 नवा विश्वास दे


नवा विश्वास दे

तुझ्या प्रयत्नांना

नव्या उमेदीने

साकार स्वप्नांना


साकार स्वप्नांना

घे यशाची चव

पाषाणावरती

रुजून दाखव 


रुजून दाखव 

फुलून दाखव

श्रावणासारखे

जगून दाखव


जगून दाखव

कर नवे काही

आता बंधनांची

तुला सक्ती नाही, 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract