STORYMIRROR

निलेश कवडे

Abstract Tragedy Fantasy

3  

निलेश कवडे

Abstract Tragedy Fantasy

बेचैनी माझी

बेचैनी माझी

1 min
277

डोळ्यांमध्ये दाटावी बेचैनी माझी

एकांताने वाचावी बेचैनी माझी


जिद्दी वृत्तीचा मी कैदी पक्षी आहे

आभाळाने जाणावी बेचैनी माझी


माझ्यापाशी सांजेला कोणीही नाही

मी कोणाला सांगावी बेचैनी माझी


माझ्यासाठी डोळ्याला येतो कोणाच्या

त्या अश्रूने मांडावी बेचैनी माझी


अंधाराने कानाडोळा केला रात्री

चंद्राने सांभाळावी बेचैनी माझी


माझ्या तृष्णेचा अंदाजा आहे ज्याला

त्या दर्याने मोजावी बेचैनी माझी


काही बाकी राहावे ना पाठीमागे 

काही ऐसी संपावी बेचैनी माझी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract