STORYMIRROR

निलेश कवडे

Others

3  

निलेश कवडे

Others

झोका

झोका

1 min
374


काळजाच्या फांद्यांवर

आला श्रावण फुलुनी

उंच उंच झोका जाई

वाऱ्यावरती झुलुनी


पाने कोवळ्या मनाची

पंख उघडू लागली

श्रावणाने जगण्याची

पुन्हा रंगत आणली


आभाळाच्या काळजाचे

झोका ठोठावुनी दार...

वाऱ्यावरती लिहतो

जगण्याचे खरे सार...


बिनदोरीचा झोकाही

पापण्यांवर झुलतो...

श्रावण आल्यावर

मनासारखे जगतो...


झोका अल्लड 'मनाचा'

घेई सृष्टीचा कानोसा

मनामनाच्या झोक्यांचा

जणू श्रावण जानोसा


Rate this content
Log in