पालवी
पालवी
नवपालवीने
अवनी मोहरली
नववधू प्रियाला
पाहून बावरली
उष्मेत जाळला
ग्रीष्म तिला
हिरवा शालू घेऊन
वसंत आला
नटली अवनी
हिरवाईने
बहरून आली
नवचैतन्याने
निसर्गाने दिले
नक्षत्रांचे देणे
हिरवाईचा शालू
सवाष्णीचे लेणे
