शोध मनाचा
शोध मनाचा
मन माझे सैरभैर फिरे
धावे चारी दिशांना
अडवून धरता विचारी
बांध का भावनांना
सारे दडले तुझ्यात
शब्द घेती शोध
कसे सांगू तुजला
हा तर प्रेमाचा बोध
भावना व्यक्त न होती
अडथळे येती फार
गुंतलेल्या मना सावरण्या
शब्दच देई आधार
अंतरीचे भाव माझे
कुणासमोर व्यक्त करू
प्रेमात दडल्या भावना
कसा नवीन मार्ग सुरु करू
आयुष्याच्या जडणघडणीत
प्रसंग येई सुख दुःखाचा
आरशातील प्रतिमा मज विचारी
कसा घेशील तू शोध मनाचा
