आयुष्यातील इंद्रधनुष्य
आयुष्यातील इंद्रधनुष्य


ऐक ना सखी
आपण किती होतो ना सुखी
रम्य होत बालपण
काहीच नव्हत काम पण
ऐक ना सखी
आठव ना बालपणीचे ते दिवस
माहीत नव्हते पूजापाठ आणी नवस
दिवसभर हुंदडायचे
रानमेवा खायचे,आजी आजोबा किती ग लाड करायचे.
ऐक ना ग सखी
शाळा म्हणजे दुसर घरच वाटायच
गुरूजी आणी बाई कुणीही येऊन रागवायच
पण त्यातही माया ,प्रेम,आणी भविष्याची काळजी असायची.
ऐक ना ग सखी
हरवल ग बालपण
आता आल आईपण
पिज्जा,बर्गर ने लावली मुलांचा थाट
बफे नी लावली ताटांची वाट
मोबाईल आला पोरांच्या हाती
कुठे देवापुढे हात जोडती.
ऐक ना ग सखी
सर,मॅम मारतच नाहीत
मॉम अन डॅडना मुल कोणत्या वर्गात माहीतच नाहीत
ऐक ना ग सखी
कुठे ग गेले आयुष्यातील ते इंद्रधनु
चल ना आपण शोधून पाहू.....