भेट तुझी स्मरते
भेट तुझी स्मरते
काय...
कुठं काय..
मग पुन्हा मीच, कायतर..
पुन्हा तूच ,कुठं कायतर...
बोलायला काहीच
न गवसलेल्या
कित्येक भेटी आपल्या
आणि मग
तिथून निघून आलं
की हे राहील सांगायच
ते राहील करित
तासतासभार फोन चालूच
फोन ठेवताना
तू म्हणतोस
बाकीच भेटल्यावर बोलू
मग भेटल्यावर
मी काय
आणि तू पुन्हा
कुठं काय ...