Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

प्रमोद राऊत

Others

3  

प्रमोद राऊत

Others

जीवन गाणे कोरोनाला सोडून द्यावे

जीवन गाणे कोरोनाला सोडून द्यावे

2 mins
289


अश्या रम्य सायंकाळी आठवण झाली

न कळत स्मृती परत परत जागृत झाली

तिच्या मनात घर होत माझं इवलेसे

त्यात नव्हत्या भिंती दुरावा समज

गैरसमज विश्वास भावना असे

नाही कधीच चर्चेस आले नाही

नकार दिल्याने होकार दिल्याने

चर्चा होत होतीच मत मांडत

विचार मंथन सुरू असायचे !!


प्रश्न सुचयाचे अन उत्तर शोधायचं

संवाद अखंडित होताच नकळत

रुसवा असायचा हुट्ट पण असल्याचा

लाडिक लाडिक जिव्हाळा पण मनातून

होता विस्मृतीत जागृतीचा अविष्कार

सूर्यास समान तळपायाला लागायचा


नियतीने मात्र वेगळं लिहिले होते 

हे घडायचं त्या अगोदर वादळाच्या पुर्वी ची

भयाण शांतता होती

ती आज खूपच नाराज होती तिच्या नजरेत भीती

अंधार असमर्थता असहायता अपराध दिसत होता

शब्द ओठात अडकले होते भावना व्यक्त होत

नव्हत्या मन विषयावर स्थिर नव्हते मग नक्कीच

असेच न थांबता पुढे जाण शक्य नव्हते 


सोसलेल्या आठवणी च गाठोडं जड होत

बस मन थांबू म्हणू शकत नव्हत पैलतीरावर

सुखाचा सागर वाट बघत होता मग दुःखाच्या दरीत

का थांबायचे मग लगबग झाली आली आरोळी

साद होती 2020 च्या शेवटच्या घटका

संपवण्यासाठी


थांबायचं नाही खुप खुप सोसले

हात धुवून मास्क घालून लाठी खाऊन

थाळी वाजवली मेणबत्ती पेटवली 

पाठ सोडत नाही उहान मधून आला

बिना तिकीट सगळीकडे गेला जिथं संधी मिळाली

तीत स्वतःच सोन करून घेतलं घर दार sanitizer

फवाऱ्यामध्ये स्वच्छ होऊन गेले पण

थांबले होते अर्थ चक्र हरवला होता गोड घास

नाही घेता आला मोकळा श्वास घुसमट झाली


सुख दुःख मंदिरे मशीद चर्च सगळे बंद

श्रद्धा भक्ती विश्वास प्रेम स्नेह फक्त होते

म्हणायला खांदा देता येत नव्हता 

बंद पिशवीत येत होते नातेवाईक नाही

धर्मपरंपरांचे चाली रीती दफन दहन

सारे बदलून गेले होतेवारी नाही

दिंडी पण नाही सण नाही समारंभ तर अजिबात

नाही अहो शाळा बंद रस्ते मोकळे फिरायचं तर कारण

योग्य असेल तर परवानगी मयत असो वा लग्न फक्त 20

एक तर 2020 हे वर्ष एक विष होते


फक्त दवाखान्यात जायला अडचण अजिबात नव्हती

पण गेल्यावर माघारी येण्याची शक्यता नाही

फक्त भीती जवळ जवळ यायचं नाही

मास्क न संवाद साधला दबक्या आवाजात जाईल म्हणून वाट बघतोय

दोन दिसांनी 31 डिसेंबर ला संपेल ही एक पणवती

उगवेल एक नवी सकाळ 2021

नसेल काही बंधनकारक

असेल सगळं सुखमय मोकळं

मनसोक्तपणे आनंद मिळावा जगण्याचा 

सुख शांती समृद्धी नानाविध कार्यक्रम

व्हावेत असे स्वप्न बघत होतो

म्हणून मनात एक सुमधुर गीत आपोआप ओठावर आले

भले बुरे घडून गेले विसरून जाऊ कोरोनाला

आनंद मिळो सगळ्या ना जगण्याला



Rate this content
Log in